पाकिस्तानात उद्भवलेली अराजकसदृश स्थिती दिवसेंदिवस चिघळतच चालली आहे. पोलीस आणि सरकारविरोधी निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये किमान तीन जण ठार, तर पाचशेहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. ‘पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ’ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि अवामी तहरिकचे मौलवी ताहिर उल काद्री आपल्या मागण्यांशी तसूभरही तडजोड करण्यास तयार नसून पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
शनिवारी मध्यरात्री आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक झाली. शनिवारी रात्रभर हा गोंधळ सुरूच होता. अखेरीस रविवारी सकाळी आंदोलकांवर अल्पसे नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले.
पाकिस्तानातील परिस्थिती चिघळली
पाकिस्तानात उद्भवलेली अराजकसदृश स्थिती दिवसेंदिवस चिघळतच चालली आहे. पोलीस आणि सरकारविरोधी निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये किमान तीन जण ठार, तर पाचशेहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत.
First published on: 01-09-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan armys top brass meet political crisis violence continue