अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात पाकिस्तानकडून घुसखोरीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रविवारी सकाळी ओबामा भारतात दाखल होण्याच्या काही तासांपूर्वीच भारतीय हद्दीत घुसखोरीच्या तयारीत असणाऱ्या दहशवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात आला. येथील आर.एस. पुरा सेक्टरनजीक शनिवारी रात्रीपासून दहशवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र, तरीही दहशतवादी सातत्याने भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत प्रवेश मिळावा म्हणून पाकिस्तानी लष्कराकडूनदेखील भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांना कव्हर फायरिंग देण्याचा पाकिस्तानी लष्कराच प्रयत्न असल्याचे लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फोल ठरल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले.
जम्मू-काश्मीर सीमारेषेवर दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे जोरदार प्रयत्न
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात पाकिस्तानकडून घुसखोरीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-01-2015 at 04:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan based militants make desperate bid to infiltrate into jammu and kashmir