पाकिस्तानच्या वायव्य भागातील ओराकझाई आदिवासी पट्टय़ात सुरक्षा चौकीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात किमान आठ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. ओराकझाईतील मुख्य शहर असलेल्या कलायामधून सदर बॉम्ब रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने उडविण्यात आला, असे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
तालिबान्यांना विरोध करीत असल्याने फिरोजखेल आदिवासींना लक्ष्य करण्याचा या स्फोटाचा उद्देश होता. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फिरोजखेल आदिवासींनी सरकारच्या समर्थनार्थ संघटना स्थापन केली असून त्यांच्यावर तेहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानातील बंदी घालण्यात आलेल्या संघटनेमार्फत यापूर्वी हल्ला करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा