पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी नवाज शरीफ सरकारला विविध मोर्चे, आंदोलनांना सामोरे जायचे आहे. नवाज शरीफ सरकार हे जनविरोधी असून, या सरकारने पायउतार व्हावे, अशी मागणी करत माजी क्रिकेटपटू व राजकीय नेता इम्रान खान आणि मौलवी ताहिरुल काद्री यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलने होणार आहेत.
काद्री यांनी ‘क्रांती मोर्चा’चे आयोजन केले आहे, तर ‘स्वातंत्र्य मोर्चा’चे आयोजन करणार इम्रान खान त्यांना साथ देणार आहे. ‘‘शरीफ सरकाने जनतेची कोणतीही कामे केली नसल्याने त्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचे गरिबांविरोधातील धोरण आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे जनता बेजार झाली आहे. त्यामुळे हे सरकार हटवावे,’’ असे इम्रान खान म्हणाला.
दरम्यान, शरीफ यांनी आंदोलकांना कडक इशारा दिला असून असे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
पाकिस्तानामध्ये शरीफ यांच्या सरकारविरोधात मोर्चेबांधणी
पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी नवाज शरीफ सरकारला विविध मोर्चे, आंदोलनांना सामोरे जायचे आहे. नवाज शरीफ सरकार हे जनविरोधी असून, या सरकारने पायउतार व्हावे
First published on: 12-08-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan braces for anti government protests