पाकिस्तानमधील पेशावर येथे बुधवारी एका बसमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात १५ जण ठार आणि ३० जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये मोठ्याप्रमाणावर सरकारी कर्मचारी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी बसमध्ये ५० जण होते. बस पेशावरच्या सद्दर भागातील मुख्य रस्त्यावरून शहराकडे जात असताना हा स्फोट झाला. या बॉम्बस्फोटाबद्दल आत्ताच काही बोलणे उचित ठरणार नाही. मात्र, प्रथमदर्शनी पाहता स्फोटके बसच्या आतल्या भागात ठेवली असावीत, असा आमचा अंदाज असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहम्मद काशिफ यांनी सांगितले.

Story img Loader