पाकिस्तानमधील महागाई सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. अन्नधान्य खरेदी करण्यासाठीही पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या समस्यांना समोर जावं लागत आहे. दुसरीकडे देशात बेरोजगारी वाढत आहे. दररोज हजारो पाकिस्तानी तरुण नोकऱ्या गमावत आहेत. अशात पाकिस्तान सरकारी कर्मचाऱ्यांची पगार १० टक्क्यांनी कपात करण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमधील आर्थिक समस्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एनएसी’ ही समिती स्थापन केली आहे. त्या समितीने आपला अहवाल पंतप्रधानांकडे सादर केला आहे. त्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांची पगार १० टक्क्यांनी कमी करण्यासह मंत्रालय आणि अन्य विभागांच्या खर्चात १५ टक्के कपात करणे. तसेच, राज्यमंत्री आणि सल्लागारांची संख्या ७८ वरून ३० पर्यंत कमी करणे, असं सुचवण्यात आलं आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Cotton is a key kharif crop in India, with Maharashtra producing 90 lakh bales
बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ
kalyan unemployed youth fraud
कल्याणमध्ये रेल्वेत नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची ७४ लाखांची फसवणूक
rbi cuts growth forecast to 6 6 percent
विकास दराचा अंदाज कमी; रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षासाठी ६.६ टक्क्यांचे अनुमान
recruitment at airports authority of india job opportunities in customs marine wing
नोकरीची संधी : एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती

हेही वाचा : सुषमा स्वराज यांचा एक फोन आणि पाकिस्तानचा भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लॅन फसला; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा खळबळजनक दावा

सरकारी तिजोरीतून कोणत्याही कारणासाठी निधीचा वापर करु नये. प्रकल्पांसाठी निधीचा वापर, सरकारी हमी आणि कर्ज देण्यावर रोख लावण्यात यावी, असंही ‘एनएसी’ने सुचवलं आहे.

हेही वाचा : पूर्व लडाखमधील नियमित गस्तीच्या २६ ठिकाणी भारतीयांसाठी ‘अघोषित’ बफरझोन? उच्चस्तरीय बैठकीत धक्कादायक दावा!

दरम्यान, पाकिस्तानचा परकीय चलनसाठा केवळ तीन आठवड्यांपुरता उरला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ६ अब्ज डॉलरची मदत दिली होती. चीन आणि सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. तर, सौदी अरेबियाने पाकिस्तानला २ अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.

Story img Loader