पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या भूकंपातील बळींची संख्या ५१५ झाली आहे. कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देशाच्या आपत्कालीन विभागाने व्यक्त केली.
भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या अवरान भागात सर्वाधिक नुकसान झाले असून, पाकिस्तानी सैन्यदलाचे तिथे बचावकार्य सुरू आहे. मात्र दहशतवादी वारंवार या बचावकार्यात अडथळे आणत आहेत. सैन्यदलाची हेलिकॉप्टर या परिसरात अन्नपदार्थ पुरवत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात हेलिकॉप्टरचे काहीही नुकसान झाले नाही. गुरुवारीही सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरवर दहशतवाद्यांनी रॉकेटहल्ला केला. त्यात राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखांसह सैन्यदलाचा एक अधिकारी वाचला.