पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. तर आज मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे.पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी या निकालांचा आधीच अंदाज वर्तवला होता. अजय बिसारिया यांच्या म्हणण्यानुसार ही निवडणूक गोंधळाने भरलेली असेल. पाकिस्तानमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेत लष्कराची मोठी भूमिका असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष (पीएमएल-एन) पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. सध्याचे ट्रेंड आणि जाहीर झालेल्या निकालांमध्ये नवाझ शरीफ यांचा पक्ष पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२६६ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून तब्बल ५ हजार १२१ उमेदवार यावेळी रिंगणात होते. तर जवळपास १२ कोटी लोकांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. आज पाकिस्तानात मतमोजणी सुरू असून नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग पक्ष आघाडीवर आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये पीएमएल-एनने १७ जागा जिंकल्या आहेत, इम्रान खानच्या पीटीआय समर्थक अपक्ष उमेदवारांनी १८ जागा जिंकल्या आहेत आणि बिलावल भुट्टोच्या पीपीपीने १७ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानमधील वृत्तसंस्था डॉनने ही आकडेवारी दिली आहे. नवाझ शरीफ आणि त्यांच्या मुलीलाही अभूतपूर्व यश मिळालं आहे. इम्रान खान तुरुंगात आहेत आणि तेथूनच त्यांनी सत्तेत परतण्याचे मनसुबे रचले आहेत. तर, अपक्षांच्या मदतीने नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम पक्ष सत्ता स्थापनेसाठी दावा करणार असल्याचे वृत्त आहे.

नवाज सत्तेत आल्यानंतर दक्षिण आशियातील समीकरणे बदलू शकतात

नवाझ शरीफ हे पाकिस्तानाची प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तसंच, नवाज हे भारताबरोबरच्या उदारमतवादी संबंधांसाठी ओळखले जातात. निवडणूक प्रचारादरम्यानही नवाझ शरीफ यांनी भारताशी असलेले संबंध हे प्रसिद्धीचे साधन बनवले होते. नवाझ शरीफ देशाचे पंतप्रधान असताना जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या प्रभावाखाली पाकिस्तानी लष्कराने कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. मात्र कारगिलनंतर संबंध सुधारण्यासाठी नवाझ शरीफ हे उदारमतवादी वृत्ती स्वीकारली.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ते भारतात आले होते. पंतप्रधान मोदींनीही कोणतीही पूर्वसूचना न देता नवाझ शरीफ यांच्या घरी झालेल्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. निवडणुकीदरम्यान नवाज यांचे एक विधान चांगलेच व्हायरल झाले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शेजारी (भारत) चंद्रावर पोहोचला आहे आणि पाकिस्तान भाकरीसाठी धडपडत आहे. नवाझ शरीफ पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानच्या अन्य देशांशी असलेल्या संबंधांनाही नवा आयाम मिळू शकतो, असे मानले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan election 2024 tough fight between nawaz sharif and imran khan according to preliminary estimates which party is leading sgk