इस्लामाबाद : तोशाखाना प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने निवडणूक लढविण्यासाठी पाच वर्षांची बंदी घातली आहे, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
येथील कायद्यानुसार, न्यायालयाने दोषी ठरविलेली व्यक्ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीसाठी लोकांचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही. ही मुदत जास्तीत जास्त पाच वर्षे आहे. इम्रान खान यांना तोशाखाना भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांनी मंगळवारी या शिक्षेला आव्हान दिले. सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय पक्षपाती असून न्यायाशी घोर प्रतारणा करणारा आहे, अशी प्रतिक्रिया इम्रान यांनी दिली.
तोशाखाना प्रकरणात भ्रष्ट व्यवहार केल्याचा ठपका ठेवत इस्लामाबाद सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर ७० वर्षीय इम्रान खान यांना शनिवारी अटक करण्यात आली. सध्या ते तुरुंगात आहेत. खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या वकिलामार्फत याचिका करून या खटल्यातील दोषी आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात अपील केले आहे.