Pakistan General Elections Results 2024 : पाकिस्तानमध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या. ज्याचे निकाल आज (दि. ९ फेब्रुवारी) लागत आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तुरुंगात असून त्यांच्या पक्षाचे नेते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. हाती येत असलेल्या माहितीनुसार नवाझ शरीफ यांच्या पक्षाला ते टक्कर देत आहेत. दरम्यान मुंबईवर २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद हा लाहोर एनए-१२२ या मतदारसंघातून निवडणुकीला उभा होता. मात्र पाकिस्तानच्या जनतेने दहशतवाद्याच्या मुलाला स्वीकारले नाही. या निवडणुकीत हाफिज सईदच्या मुलाचा अतिशय दारूण पराभव झाला. यामुळे आपल्या मुलाला संसदेत पाठविण्याचा हाफिज सईदचा डाव धुळीस मिळाला, असल्याचे सांगितले जाते.

लाहोर एनए-१२२ या मतदारसंघातील इम्रान खान यांच्या पक्षाचा अपक्ष उमेदवार लतीफ खोसा याने विजय मिळविला. त्याला १ लाख १७ हजार १०९ एवढे प्रचंड मतदान मिळाले. तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे उमेदवार ख्वाजा साद रफिक यांना ७७,९०७ मते मिळाली. हाफिज सईदच्या मुलाला केवळ २०४२ मते मिळाली.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Why Dispute in MVA?
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत? महापालिका निवडणुकांच्या आधीच उभा दावा ?
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
Delhi minority areas delhi assembly election
‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?

Pakistan Election 2024 : नवाझ शरीफ आघाडीवर, इम्रान खान समर्थक उमेदवारांची स्थिती काय?

हाफिज सईद याने पाकिस्तानच्या राजकारणावर पकड मिळविण्यासाठी पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीगची (PMML) स्थापना केली होती. हाफिज सईदच्या पक्षाने संसद आणि राज्यातील विधानसभांच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र एकाही जागेवर त्याच्या पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळविता आलेला नाही. हाफिजचा मुलगा तल्हा सईद याचा तर पराभव झालाच. त्याशिवाय पीएमएमएल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खलिद मसूद सिंध यांचाही एनए – १३० या मतदारसंघात पराभव झाला.

तल्हा सईद याने दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्याच्या निवडणूक लढविण्यावरदेखील पाकिस्तानमधून विरोध झाला होता. बीबीसी उर्दू वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदच्या पीएमएमएल पक्षाच्या उमेदवारांमध्ये त्याच्या नातेवाईकांचा किंवा बंदी घातलेल्या जमाद-उद-दावा आणि लष्कर-ए-तय्यबा संघटनेच्या सदस्यांचा समावेश आहे.

Story img Loader