Pakistan Ex PM Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

पीटीआयने जारी केलेल्या व्हिडीओत पोलीस इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरून अटक करून पोलीस गाडीत नेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करताना पीटीआयने म्हटलं, “ज्याला त्याच्या जीवापेक्षाही तुमच्या स्वातंत्र्याची काळजी आहे त्याच्यासाठी घराबाहेर पडा.”

nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Pakistan former PM Imran Khan
Imran Khan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कायदेभंग आंदोलन करण्याचे आवाहन, पाकिस्तानमध्ये यादवी माजणार?
Hina Khan
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”
Salman Khan Meet Zeeshan Siddique
सलमान खान झिशान सिद्दिकींबरोबर दुबईला रवाना; फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Uday Pratap College is spread over 100 acres of land and is a renowned educational hub in eastern Uttar Pradesh. (Photo: College Website)
Varanasi college  : शुक्रवारच्या नमाज पठणाविरोधात हनुमान चालीसाचा जप, महाविद्यालयात तणाव, कुठे घडली ही घटना?

पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या वकील मुसरत चीमा यांनीही इम्रान खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. पीटीआयने वकिलांचा व्हिडीओ ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात वकील मुसरत यांनी इम्रान इस्लामाबाद न्यायालयाबाहेर जखमी झाल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : पाकिस्तानात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होत असल्याने कबरींवर लोखंडी जाळी आणि कुलुप? वाचा सत्य…

वकील मुसरत यांनी इस्लामाबाद न्यायालयाबाहेरच व्हिडीओ शूट केला आणि घाबरलेल्या स्थितीत म्हणाल्या, “इम्रान खान यांना मारहाण होत आहे, अत्याचार होत आहे. त्यांनी इम्रान खान यांचं काय केलं हे मला माहिती नाही.”

Story img Loader