पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना न्यायालयाने बुधवारी तोशखाना प्रकरणी १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, अशी माहिती पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या बातमीनुसार इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला आता १० वर्ष कोणतेही सार्वनिक पद स्वीकारण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच दोघांनाही प्रत्येकी ७८७ पाकिस्तानी दशलक्ष रुपयांचा (जवळपास २३ कोटी) दंड भरण्याचे आदेश दिला आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना कालच (३० जानेवारी) सिफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांनी अत्यंत गोपनीय माहिती ही सार्वजनिक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. इम्रान खान यांच्यासह या प्रकरणी माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
pune builder punishment
पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास शिक्षा, सहा महिने कारावास आणि वीस लाख रुपयांचा दंड
Pakistan former PM Imran Khan
Imran Khan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कायदेभंग आंदोलन करण्याचे आवाहन, पाकिस्तानमध्ये यादवी माजणार?

विश्लेषण : इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट, पाकिस्तानमधील ‘तोशखाना प्रकरण’ नेमकं काय?

पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील अडियाला तुरुंग न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी तोशखाना प्रकरणी शिक्षा सुनावली. सिफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ७१ वर्षीय इम्रान खान यांना आज दुसरा झटका मिळाला. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार शिक्षा सुनावताना बुशरा बीबी न्यायालयात उपस्थित नव्हत्या.

तोशखाना प्रकरण काय आहे?

तोशखाना प्रकरणात इस्लामाबाद न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरोधात मागच्यावर्षी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. तोशखाना हे पाकिस्तानधील एका शासकीय विभागाचे नाव आहे. लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू तोशखाना विभागात जमा कराव्या लागतात. इम्रान खान यांनी त्यांना मिळाळेल्या मौल्यवान भेटवस्तू विकल्या आणि त्यातून पैसे मिळवले. तसेच त्यांनी मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाकडे उघड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांचा तुरुंगवास, सिफर प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा

इम्रान खान २०१८ साली पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. तेव्हापासून त्यांना वेगवेगवळ्या देशांकडून मौल्यवान वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. मात्र या भेटवस्तूंची माहिती त्यांनी तोशखाना विभागाला दिलेली नाही. तसे केले तर पाकिस्तानचे इतर देशांशी असलेले संबंध बिघडतील, असा दावा इम्रान खान यांच्याकडून केला जातो. हाच मुद्दा घेऊन विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते.

सिफर प्रकरण काय आहे?

तोशखाना प्रकरणाआधी सिफर प्रकरण खटल्यात इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली गेली. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. अत्यंत गुप्त माहिती वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचा इम्रान खान यांच्यावर आरोप आहे. सत्तेपासून बेदखल झाल्यानंतर इम्रान खान यांनी थेट अमेरिकेवर आरोप केला होता. मला सत्तेतून बेदखल करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. वॉशिंग्टन येथील एका एम्बेसीने मला एक गुप्त टेप पाठवली होती, असा दावाही इम्रान खान यांनी केला होता. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या, असा आरोप सिफर प्रकरणात करण्यात आला आहे.

Story img Loader