इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटचे सहकारी शाह महमूद कुरेशी यांना एक गोपनीय राजनैतिक संदेश (केबल) फोडल्याच्या संबंधात ‘सरकारी गोपनीयता कायद्याखाली’ अटक करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला समान संधी दिली जावी, अशी मागणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उपाध्यक्ष असलेले ६७ वर्षांचे कुरेशी यांनी केल्यानंतर लगेचच शनिवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली. कुरेशी यांनी मंत्री असताना पाकिस्तानी राजदूतावासातून अमेरिकेला पाठवण्यात आलेल्या सरकारी संदेशाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आहे.