पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तर हल्लेखोरास पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

हेही वाचा >>> Firing at Imran Khans Rally : गोळीबारात जखमी झाल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

“पाकिस्तामध्ये इम्रान खान यांच्यावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आम्ही या घटनेवर नजर ठेवून आहेत. आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींवरही आमचे लक्ष असेल,” असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Video : रॅलीवरील गोळीबारानंतर इम्रान खान जखमी, हल्लेखोरास अटक; पाहा हल्ल्यानंतरचे दृश्य

पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?

इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफकडून (पीटीआय) पाकिस्तानमध्ये तातडीने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत आहे. याच मागणीला घेऊन लाहोर ते इस्लामाबादपर्यंत ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा ४ नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथे पोहोचणार होता. मात्र त्याआधीच वझिराबाद येथील जफर अली खान चौक येथे हा मोर्चा आल्यानंतर त्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: विराटने ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? भारताला बसणार का फटका?

रॅलीमध्ये झालेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. या घटनेनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्लाहच्या कृपेने मी बचावलो. अल्लाहमुळे मला दुसरे जीवन मिळाले, असे इम्रान खान म्हणाले आहेत. तर पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी तपास यंत्रणेला घटनेबद्दलचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.