इस्लामाबाद हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर पाकिस्तान तरहीक ए इंसाफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान शनिवारी रात्री लाहौर येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे कार्यकर्ते, महिला आणि लहान मुलांसह सर्वजण जमान पार्क येथे उपस्थित होते. इम्रान खानच्या समर्थकांनी रस्त्यावर मार्च काढत आंनदोत्सव साजरा केला.

जामीन मिळाल्यानतंरही इम्रान खान बराच वेळ हायकोर्टाच्या परिसरात होते. पोलिसांकडून पुन्हा संभाव्य अटकेपासून वाचण्याकरता ते लिखित आदेशाची प्रतीक्षा करत होते. तसंच, एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी त्यांना हायकोर्ट परिसर न सोडण्याचे आदेश दिले होते. यामुळ इम्रान खान यांनी संताप व्यक्त करत पुढच्या १५ मिनिटांत इस्लामाबादचे रस्ते उघडले नाही तर ते मोठं पाऊल उचलू, असा इशारा दिला होता. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस हस्तक्षेप करत समर्थकांची समजूत काढली आणि इम्रान खान यांना न्यायालयीन परिसर सोडण्यास परवानगी मिळाली.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

हवेत गोळीबार

दरम्यान, या काळात हायकोर्ट परिसरात अनेकवेळा हवेत गोळीबार झाला. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस अधिकारी अलर्ट झाले होते. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षित आहेत आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे, अशी माहिती इस्मामाबाद पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली. श्रीनगर हायवे एच ११ येथेही गोळीबाराचा आवाज आला होता. तसंच, दोन ते तीन दिवस येथे इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली होती. कालांतराने ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

इम्रान खान म्हणाले की, “माझं केलेलं अपहरण आणि त्यानंतर माझ्या अटकेची कहाणी मी पाकिस्तानातील संपूर्ण जनतेला जाऊन सांगणार आहे. मी सुरक्षित बाहेर पडण्यास यशस्वी ठरलो. दबावात येऊन अखेर त्यांनी मला जाण्यास परवानगी दिली. बाहेर निघाल्यावर मला कळलं की रस्त्यावर ट्राफिक नाहीय, म्हणजेच कोणताही धोका नव्हता.”

या आठवड्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पाकिस्तानात हिंसाचार उफाळून आला होता. परंतु, त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या अटकेला अवैध ठरवले.

लष्करी अधिकाऱ्यांकडून आरोप

पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त मेजर आदिल रझा यांनी ट्विटरवर दावा केला होता की, इम्रान खानचे समर्थ असल्याने त्यांच्या पत्नींसह 100 हून अधिक लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. प्रत्येकाची चौकशी केली जात आहे. लष्कराचे लाहोरस्थित कॉर्प्स कमांडर सलमान फय्याज घनी यांना पदावरून हटवण्यात आले आहे. इम्रानच्या समर्थकांनी घनी यांच्या घरातून मोर, कोंबडीसह अनेक वस्तू चोरून नेल्या होत्या. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई न केल्याने त्यांना हटवण्यात आले आहे. इम्रानबद्दल सहानुभूती असल्याच्या आरोपावरून लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवल्याचा दावाही रझा यांनी केला आहे.