पीटीआय, इस्लामाबाद : इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंजाब प्रांतातील अटक कारागृहातून रावळिपडी शहरातील उच्च सुरक्षा असलेल्या अदियाला तुरुंगात स्थानांतरित करण्याचे आदेश दिले. इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने ही माहिती दिली.
‘पीटीआय’ पक्षाने ऑगस्टमध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खान यांना त्यांची समृद्ध कौटुंबिक पार्श्वभूमी, सामाजिक आणि राजकीय स्थिती लक्षात घेऊन ‘अ श्रेणी’ सुविधा उपलब्ध असलेल्या अदियाला कारागृहात हलवण्याची विनंती केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी हा आदेश दिला.