पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला बांधून हा अत्याचार केला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा >>> खलिस्तान समर्थकांची सुवर्ण मंदिराच्या गेटवर तलवारी घेऊन घोषणाबाजी; भिंद्रनवालेचे पोस्टर झळकावले

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येथील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये पाच जणांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याआधी आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला मारहाण केली. तसेच पतीला बांधून या गर्भवती महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर महिलेने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण करुन महिलेसोबत घडलेला प्रकाराची माहिती दिली. रुग्णालय प्रशासनाने महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी लाहोरला पाठवले आहेत.

हेही वाचा >>> केरळ : प्राथमिक शाळेतील दोन विद्यार्थ्यांना ‘नोरोव्हायरस’चा संसर्ग, अनेक विद्यार्थ्यांच्या केल्या चाचण्या; जाणून घ्या लक्षणं, उपचार

या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. तसेच आरोपींना पकडण्यासाठी शोधमोमहीम सुरु करण्यात आली आहे. पंजाबच्या आयजीपींनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

हेही वाचा >>> मुसेवालांच्या हत्येनंतर मोठ्या घडामोडीची दाट शक्यता; पंजाबमधील चार तुरुंगांमध्ये सुरक्षा वाढवली

दरम्यान, मागील महिन्यात एका २५ वर्षीय महिलेवर कराचीमध्ये चालत्या रेल्वेमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आता गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे पाकिस्तामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याच्यारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे मागील सहा महिन्यात २४३९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यापैकी ९० महिलांचा बलात्कारानंतर खून करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येथे बलात्काराच्या रोज ११ घटनांची नोंद होते.

Story img Loader