What are the prices of 1 tola gold in Pakistan? भारतात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज बुधवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २३ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,१६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८८,१४७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९६,०५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९६१ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. दरम्यान, भारतात १ लाखाचा टप्पा ओलांडणाऱ्या सोन्याला पाकिस्तानात काय किंमत आहे, हे जाणून घेऊ.

पाकिस्तानात काय आहे १ तोळा सोन्याचा भाव?

रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ३२४९४० पाकिस्तानी रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय रुपयांप्रमाणे पाकिस्तानातील सोन्याचे दर ९८,५०९ रुपयांवर पोहोचले आहेत.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.