Pakistan Trending Topics 2024: इंटरनेट आणि त्यापाठोपाठ आलेला सोशल मिडिया यामुळे लोकांचे ज्ञान मिळवण्याचे आणि संपर्क साधण्याचे मार्गच बदलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. कधीकाळी प्रश्न पडले की पुस्तकं किंवा जाणकार व्यक्तींशी चर्चा असे मार्ग अवलंबले जायचं. पण इंटरनेट क्रांतीच्या जगात कोणताही प्रश्न पडला की सर्वात आधी मोबाईल वा लॅपटॉपवर ‘गुगल’ सुरू केलं जातं. दरवर्षी असे लाखो कोटींच्या पटीत प्रश्न गुगलला विचारले जातात आणि गुगलकडून त्यावर उत्तरं सादर केली जातात. २०२४ वर्षं संपत असताना या वर्षभरात गुगलवर पाकिस्तानमधून शोधण्यात आलेल्या गोष्टींची यादी नुकतीच समोर आली असून त्यातून अनेक रंजक गोष्टी पुढे आल्या आहेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Google Year in Search 2024 या सुविधेचा वापर करून सध्या वेगवेगळ्या देशात वर्षभरात कोणत्या गोष्टी शोधल्या जात होत्या, याची माहिती चर्चेत आली आहे. त्यात पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कोणत्या गोष्टींची माहिती शोधली जात होती, याबाबतच्या तपशिलात क्रिकेट, बॉलिवुड चित्रपट, आयफोन, बनाना ब्रेड रेसिपी अशा बाबींचा समावेश आहे. त्यातच एखादी गोष्ट कशी करावी? अशा आशयाच्या ‘How to…’ श्रेणीमध्ये पाकिस्तानमधील युजर्स काय शोधत होते, याची यादी समोर आली असून त्यात लखपती बनण्याचा मार्ग दुसऱ्या क्रमांकावर आहे!

‘आजीच्या मृत्यूआधी लखपती कसं बनावं?’

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर मतदान केंद्र कसं शोधावं (How to check polling station) हा प्रश्न आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आजीच्या मृत्यूआधी लखपती कसं व्हावं? (How to mak millions before grandma dies) हा प्रश्न आहे. तिसऱ्या क्रमांकावर सेकंड हँड कार कशी घ्यावी? हा प्रश्न आहे. चौथ्या क्रमांकावर फुलं दीर्घकाळ ताजी कशी ठेवावीत? हा प्रश्न असून सर्वाधिक शोधल्या गेलेल्या प्रश्नांमध्ये संगणकावर यूट्यूब कसं डाऊनलोड करावं? हा प्रश्न आहे!

Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!

गुगलवर पाकिस्तानचं बॉलिवूडप्रेम!

दरम्यान, मनोरंजन विश्वात पाकिस्तानकडून बॉलिवुडमधील चित्रपट आणि काही वेब सीरिजची माहिती गुगलवर सर्वाधिक शोधण्यात आली. त्यात अॅनिमल, स्त्री २ यासारख्या चित्रपटांसह हीरामंडी ही वेब सीरिज आणि बिग बॉस १७ या रिअॅलिटी शोचाही समावेश आहे.

क्रमांकमनोरंजनविषयक विषयांचे शोध
हीरामंडी
१२वी फेल
अॅनिमल
मिर्झापूर सीजन ३
स्त्री २
इश्क मुर्शिद
भूलभुलैय्या ३
डंकी
बिग बॉस
१०कभी मैं, कभी तुम

क्रिकेटच्या बाबतीत भारताशी साम्य

दरम्यान, क्रिकेटच्या बाबतीच पाकिस्तानचं भारताची गुगलवर साम्य दिसून आलं आहे. भारतीयांप्रमाणेच पाकिस्तानमध्येही युजर्स २०२४ या वर्षात गुगलवर सर्वाधिक क्रिकेटबाबतच शोध घेत होते असं या यादीवरून स्पष्ट होत आहे. पाकिस्तानमध्येही युजर्सकडून टी २० वर्ल्डकप, पाकिस्तानी क्रिकेटपटू, विशेषत: शोएब मलिक आणि साजिद खान यांच्याबाबत युजर्सनं गुगलला अनेक प्रश्न विचारले. त्याशिवाय पाकिस्तानसाठी ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवणारा अर्शद नदीम हादेखील पाकिस्तानमधील युजर्ससाठी उत्सुकतेचा विषय ठरला.

क्रमांकक्रिकेटसंदर्भातील शोध
टी २० विश्वचषक
पाकिस्तान सुपर लीग २०२४ वेळापत्रक
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान विरुद्ध भारत
पाकिस्तान विरुद्ध अमेरिका
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध द. आफ्रिका
१०भारत विरुद्ध इंग्लंड

Top Searches in Pakistan 2024: पाकिस्तान २०२४ मध्ये गुगलवर काय शोधत होता? वाचा गुगल सर्च रिपोर्टची सविस्तर यादी!

दरम्यान, तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाकिस्तानमध्ये iPhone 16 Pro Max बद्दल पाकिस्तानी नागरिकांनी गुगलवर माहिती शोधली. त्याशिवाय चॅटजीपीटी, जेमिनी आणि रीमेकर डॉट एआय या एआय प्लॅटफॉर्म्सबाबतही पाकिस्तानमधील युजर्सकडून माहिती शोधण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानमधील नागरिकांचा एआय तंत्रज्ञानात वाढता रस यातून दिसून येत आहे.