इस्लामबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानात ९ मे रोजी भडकलेल्या हिंसाचारप्रकरणीही इम्रान यांच्याविरुद्ध दोन-तीन आठवडय़ांत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इम्रान यांनी या हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचे सांगत हिंसाचार उसळला तेव्हा आपण कारागृहात असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात गृहमंत्री सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री ‘जिओ न्यूज’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की या हिंसाचारास इम्रान शंभर टक्के जबाबदार आहेत.  जमीन घोटाळाप्रकरणी गुन्हा इम्रान खान यांच्याविरुद्ध रविवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. पंजाब प्रांतात ६२५ एकर जमीन किरकोळ किमतीत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर त्यांच्याविरुद्ध  १४० हून अधिक खटले दाखल झाले आहेत.