पाकिस्तान सरकारचे अधिकृत ट्विटर खातं भारतात पुन्हा एकदा ब्लॉक करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या कायदेशीर मागणीनंतर ट्विटर इंडियाने ही कारवाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पाकिस्तान सरकारचं ट्विटर खातं ब्लॉक करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – VIDEO : अमृतपाल सिंगचा नवीन व्हिडीओ आला समोर, पोलिसांना आव्हान देत म्हणाला…

या कारवाईचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तान सरकारच्या ट्विटर खात्यावर, “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचं भारतातील ट्विटर खातं निलंबित करण्यात आलं आहे”, असा संदेश लिहिला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारचं ट्विटर खातं अमेरिका आणि इतर देशांमध्ये सक्रीय राहणार आहे.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पाकिस्तान सरकारचं ट्विटर खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात भारतातील कायद्यांनुसार पाकिस्तानचे ट्विटर खाते भारतीय युजर्सना दिसू नये अशी मागणी केंद्र सरकारने ट्विटरकडे केली होती. या मागणीनुसार ट्विटरने कारवाई करत पाकिस्तान सरकारचं ट्विटर खातं ब्लॉक केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan government twitter account block in india second time in six month spb