पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यातील बाओली साहीब हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाकिस्तान सरकारने १ कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ६४ वर्षांनंतर आता या मंदिराचं बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या गावातील हिंदू नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. १९६० पासून हे मंदिर जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘द हिंदूस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील अल्पसंख्यकांच्या प्रार्थनास्थळाशी संबंधित असलेली इव्हाक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट ही संस्था या मंदिराचे बांधकाम करणार आहे. या मंदिराचा पाया खनण्याचे कामदेखील सुरु झालं आहे. या मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर पाक धर्मस्थान समितीकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. जवळपास ६४ वर्षांनंतर या मंदिरांचे बांधकाम होत असल्याने या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Pakistan : धक्कादायक! सोशल मीडिया वापरत असल्याच्या रागातून तरुणाने आई, बहीण, भाची आणि मेहुणीची केली हत्या

गेल्या ६४ वर्षांपासून या गावात हिंदू धर्मियांसाठी कोणतेही प्रार्थनास्थळ नसल्याने येथील हिंदू नागरिकांना पुजा करण्यासाठी लाहोर किंवा सियालकोट येथील मंदिरांमध्ये जावं लागत होते. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम करावं, अशी मागणी येथील गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. पाक धर्मस्थान समितीकडूनही गेल्या २० वर्षांपासून या मंदिराच्या बांधकामासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.

हेही वाचा – Constitution Amendments in Pakistan : पाकिस्तानमध्ये विरोधकांचा सरकारवर संविधान बदलाचा आरोप; शाहबाझ शरीफ यांना लक्ष्य करत म्हणाले…

यासंदर्भात बोलताना, पाक धर्मस्थान समितीचे अध्यक्ष सावन चंद म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून आम्ही मंदिराच्या बांधकामासाठी पाठपुरावा करतो आहे. आमच्या प्रयत्नांना आता कुठं यश आलं आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो. या निर्णयामुळे आता गावातील हिंदू धर्मियांना गावात पूजा करता येणार आहे.