Elon Musk Grooming Gangs : अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी ब्रिटनमधील ग्रुमिंग गँगचा मुद्दा समोर आणल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी पुरुषांच्या ग्रुमिंग गँगने (लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारी टोळी) मागच्या काही वर्षात हजारो अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याची माहिती समोर आली आहे. या विषयामुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील आरोपी पाकिस्तानी वंशाचे पुरुष असल्याचे आढळून आले आहे.

यानंतर जगभरातून या पाकिस्तानी वंशाच्या गुन्हेगारांचे वर्णन करण्यासाठी बातम्यांमध्ये ‘आशियाई’ शब्द वापरण्यात येत आहे. यावर शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्षेप घेत ‘आशियाई’ नव्हे, तर, गुन्हेगार पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावर आता खासदार प्रियांक चतुर्वेदी यांना एलॉन मस्क यांनी पाठिंबा दिला आहे.

प्रियांका चतुर्वेदीच्या पोस्टवर काय म्हणाले एलॉन मस्क

यूकेतील पाकिस्तानी ग्रुमिंग गँगचे वर्णन करण्यासाठी करण्यासाठी जगभरातील बातम्यांमध्ये ‘आशियाई’ शब्द वापरण्यात येत आहे. यावर आक्षेप घेत प्रियांका चतुर्वेदी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, “माझ्या मागे मागे म्हणा, ती आशियाई ग्रूमिंग गँग नाही तर पाकिस्तानी ग्रुमिंग गँग आहे. यासाठी आशियाई लोकांनी एका पूर्णपणे दुष्ट राष्ट्राचे पतन का सहन करावे?”

प्रियांका चतुर्वेदींच्या या पोस्टवर एलॉन मस्क यांनी एका शब्दाची कमेंट करत त्यांना पाठिंबा दिला आहे. ते प्रियांका चतुर्वेदींच्या पोस्टखाली ‘खरे’ आहे, असे म्हटले.

हे ही वाचा : Assam Police : आसाम पोलीस छापा मारायला निघाले अन् गुगल मॅपमुळे पोहोचले नागालँडला; पुढे घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का

हे ही वाचा : UK’s Grooming Gangs: ब्रिटनमधील हजारो मुलींचे पाकिस्तानी पुरुषांनी केले लैंगिक शोषण; एलॉन मस्क यांनी आवाज उठवताच ‘ग्रुमिंग गँग’ चर्चेत

ग्रुमिंग गँग म्हणजे काय?

लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांच्या गटाला ग्रुमिंग गँग म्हटले जाते. या गटात पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा समावेश असून ते अल्पवयीन मुलींना लक्ष्य करतात. सोशल मीडिया, गेमिंग आणि चॅट रुम्स अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर करून हे लोक अल्पवयीन मुलींना हेरतात. ग्रुमिंग गँगचे गुन्हेगार मुलींना नशेच्या आहारी नेतात. मुलींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो गोळा करून नंतर त्यांचे लैंगिक शोषण करतात. लैंगिक अत्याचाराच्या गर्तेत सापडलेल्या अनेक मुली गर्भवती राहिल्या असून, काही जणींची मानवी तस्करी केली गेल्याचे माध्यमात आलेल्या बातम्यांतून समोर येत आहे.

Story img Loader