कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानात राहत होता अशी कबुली पाकिस्तानने दिल्यानंतर भारतीय राजकारणात पाकिस्तानवर टीकेचे सुर उमटू लागले आहेत. आज शनिवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तान खोटारडा आणि भंपक देश असल्याचे म्हटले आहे. राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, पाकिस्तान आतापर्यंत भारताशी प्रत्येकवेळी खोटे बोलत आला आहे. याआधी दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. त्यानंतर आता दाऊद पाकिस्तानात होता असे कबूल केले यावरूनच पाकिस्तान खोटारडा देश असून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तानकडून अशी वक्तव्ये करण्यात येत आहेत. असेही संजय राऊत म्हणाले.
पूंछमधील गोळीबारात त्यांनी आपले पाच मारले, आता त्यांचे पन्नास मारून भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. त्याचबरोबर दाऊद जर पाकिस्तानात होता. मग, त्याला पासपोर्ट मिळाला कसा? यासाठीही पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने दाऊदला मदत केली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader