पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) ही भारतातील लष्करी अधिकाऱ्याला हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न करीत होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र आता त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर ती व्यक्ती तोतया लष्करी अधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. लष्करी अधिकारी म्हणून ही व्यक्ती वावरत होती असे शनिवारी दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

दिल्लीच्या मोहन गार्डन येथील रहिवासी दिलीप कुमार(४०) नावाच्या बनावट लष्करी अधिकाऱ्याच्य चौकशीसाठी गुप्तचर अधिकारी, आयबी आणि दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी पोहचले आहे. आरोपींकडून पोलिसांनी बनावट आर्मी आयडी कार्ड आणि एक मोबाइल फोन जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दिलीपकुमार याला लष्कराचा खरा अधिकारी समजून हनी ट्रॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित लोक त्याव्यक्तीकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होते.

१०० हून अधिक व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य

याआधी ग्रेटर कैलास -१ मधील अर्चना रेड लाईटजवळ सैन्य अधिकारी असल्याचे सांगत फिरणाऱ्या दिलीप कुमारला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी आरोपी अटक केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो १०० हून अधिक व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य आहे आणि १०० हून अधिक महिलांच्या संपर्कात होत. इतर अनेक देशांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकासोबतही तो संपर्कात होता असे पोलिसांनी सांगितले.

अनेक आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हिडिओ कॉल

मोबाईलची तपासणी केल्यानंतर आरोपींनी अनेक आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हिडिओ कॉलही केल्याचे आढळले. चौकशीत आरोपीने सोशल मीडियावर महिलांना प्रभावित करण्यासाठी स्वत: ला भारतीय लष्कराचा कॅप्टन शेखर असल्याचे सांगितले असल्याचे पोलिसांना सांगितले. दिलीप कुमारने काही परदेशी नागरिकांशी संवाद साधला असून त्यांच्याबरोबर काही व्हिडिओ व फोटोही शेअर केल्याचे उघड केले. दिल्ली पोलीस याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader