Pakistan Lawyer Demands Shadman Chowk Should Name After Bhagat Singh : आपल्या देशातील स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासाठी आवाज उठवणं सोपी गोष्ट आहे. परंतु, दुसऱ्या देशातील स्वातंत्र्यसैनिकासाठी आवाज उठवणं, त्यासाठी कायदेशीर लढाई लढणं खूप कठीण असतं. अशीच एक लढाई पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चालू आहे. येथील एक वकील एक दशकाहून अधिक काळापासून थोर क्रांतिकारक भगत सिंग यांच्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. इम्तियाज रशीद कुरैशी असं या वकिलाचं नाव असून त्यांना या लढ्यासाठी कित्येकदा तिथल्या कट्टरतावादी संघटनांचा सामना करावा लागला आहे. त्यांच्यावर अनेक हल्ले देखील झाले आहेत. तरीदेखील त्यांनी त्यांची लढाई चालू ठेवली आहे.

इम्तियाज कुरैशी यांनी त्यांचे वडील अब्दुल रशीद कुरैशी यांच्याबरोबर २०१३ मध्ये लाहोर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. कुरैशी यांनी इंग्रज अधिकारी (सहाय्यक पोलीस अधीक्षक) जॉन पी. सॉन्डर्सच्या हत्येचा १९२८ मधील खटला पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. या खटल्याचा निकाल देताना ब्रिटिशांच्या न्यायालयाने भगत सिंग यांच्यावर अन्याय केला होता, असं कुरैशी यांचं म्हणणं आहे. न्यायालयाने ४५० साक्षीदारांची साक्ष न ऐकता, प्रतिवाद्यांचं म्हणणं न ऐकता भगत सिंग, राजगुरू व सुखदेव या तिघांना शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे सॉन्डर्सच्या हत्येनंतर अनारकली बाजार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भगत सिंग यांचं नाव नव्हतं. कुरैशी यांच्या याचिकेवर २०१६ मध्ये शेवटची सुनावणी झाली होती. भगत सिंग यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी कुरैशी अजूनही न्यायालयाचे हेलपाटे मारत आहेत. त्यांनी याप्रकरणी निष्पक्ष सुनावणी व्हावी अशी मागणी केली आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले

हे ही वाचा >> CJI Chandrachud : “Yeah म्हणायला हे कॉफी शॉप नाही”, सरन्यायाधीश चंद्रचुडांनी वकिलाला झापलं; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

लाहोरमधील चौकाला भगत सिंग यांचं नाव देण्याची मागणी

इम्तियाज कुरैशी यांनी याआधी लाहोर उच्च न्यायालयात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, १९७३ च्या संविधानातील कलम १९९ अंतर्गत २१ फेब्रुवारी २०१८ साली आणखी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे त्यांनी पंजाब सरकारकडे मागणी केली होती की शादमान चौकाचं नामांतर केलं जावं. या चौकाला शहीद भगत सिंग यांचं नाव देण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत असं कुरैशी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं होतं. भगत सिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांना ज्या लाहोर मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली होती त्याच जागेवर आज शादमान चौक आहे. त्यामुळे या चौकाला भगत सिंग यांचं नाव दिलं जावं अशी मागणी कुरैशी यांनी केली होती.

हे ही वाचा >> Pakistan Violence : हेझबोलाचा कमांडर नसराल्लाहच्या हत्येचा पाकिस्तानात शोक; जमावाकडून कराचीत हिंसाचार; पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा

न्यायालयाे याचिका स्वीकारली

त्यानंतर न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी ही याचिका निकाली काढत लाहोरच्या लॉर्ड मेयरना निर्देश दिले होते की शादमान चौकाला भगत सिंग यांचं नाव देण्याच्या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घ्या. या घटनेला पाच वर्षे उलटली तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर कुरैशी यांनी १ मार्च २०२४ रोजी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान झाल्याचं कुरैशी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे.

हे ही वाचा >> Sunita Williams NASA : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीचा मार्ग मोकळा; ‘स्पेसेक्स क्रू ड्रॅगन’ अंतराळ स्थानकावर पोहोचलं

न्यायमूर्ती शम्स महमूद मिर्झा यांनी १३ सप्टेंबर २०२४ रोजी लाहोरमधील शादमान चौकाचं स्वातंत्र्यसैनिक भगत सिंग असं नामांतर करण्याच्या याचिकेवर आणि कुरैशी यांच्या अवमान याचिकेवर सुनावणी केली. तसेच प्रतिवाद्यांना शेवटची संधी देताना म्हटलं की या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला होईल. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Story img Loader