पाकिस्तानला दहशतवादाचा सामना करण्यासाठी देण्यात येणाऱ्या एफ १६ विमानांचा वापर भारताविरुद्ध केला जाईल, अशी भीती अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला एफ १६ देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी ते ओबामा प्रशासनाला करणार आहेत.
अमेरिकी पाकप्रेम
पाकिस्तानसोबत एफ १६ विमानांचा व्यवहार करण्याचा निर्णय आणि वेळ शंका उपस्थित करणारा आहे. याशिवाय, भारत-पाक यांच्यातील संबंध अद्यापही ताणलेलेच आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून या विमानांचा वापर दहशतवाद्यांपेक्षा भारताविरुद्ध किंवा अन्य प्रादेशिक शक्तींविरुद्ध होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य मॅट सालमन यांनी सांगितले. आपण पाकिस्तानला भारताशी नव्हे तर दहशतवादी लढ्यात उपयुक्त ठरेल, अशी युद्धसामुग्री देणे अपेक्षित असल्याचे अन्य एका सदस्याने सांगितले. भारतानेही पाकिस्तानला एफ १६ विमाने देण्याच्या निर्णयावर अमेरिकेकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
पाकिस्तान एफ-१६ विमानांचा वापर दहशतवाद्यांऐवजी भारताविरुद्ध करण्याची भीती
२०२० पर्यंत पाकिस्तानी हवाई दलातील १९० विमाने निवृत्त होणार आहेत.
आणखी वाचा
First published on: 28-04-2016 at 13:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan may use f16 fighter jets against india say us lawmakers