पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे सदस्य सय्यद अली रजा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे काय कारण आहे ते समजू शकलेले नाही. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर बेछुट गोळीबार केला आणि फरार झाले. आबिदी यांच्या घराजवळ असलेल्या खायबान-ए गाजी रस्त्यावर ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यावेळी आबिदी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते कारमध्ये एकटेच होते. त्यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर पळाले. ज्यानंतर आबिदी यांचे वडील अखलाक आबिदी यांनी त्यांना पीएनएस शीफा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आता परिसरात जमावबंदी लागू केली असून पुढील तपास सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan media former member of pakistans national assembly syed ali raza abidi shot dead in karachi