पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यापासून तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख तथा माजी पंतप्रधान इम्रान खान सरकारविरोधात आक्रमक भूमिका घत आले आहेत. सभेच्या माध्यमातून ते पाकिस्तानी सरकारवर कठोर टीका करताना दिसतात. दरम्यान, इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रसारणावर पाकिस्तानच्या माध्यम नियामक प्राधिकरणाने (PEMRA) बंधी घातली आहे. इस्लामाबादमध्ये एका भाषणादरम्यान त्यांनी इस्लामाबाद पोलीस तसेच महिला दंडाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे.
हेही वाचा >>>> दिल्ली, उत्तर प्रदेशात घातपाती कारवायांचा कट; संशयित दहशतवाद्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल
इम्रान खान यांच्या भाषणाच्या लाईव्ह प्रक्षेपणावर पाकिस्तानी माध्यम नियामक प्राधिकरणाने (PEMRA)बंदी घातली आहे. इम्रान खान यांच्या भाषण प्रसारणावर देखरेक तसेच संपादकीय नियंत्रण असेल तरच त्याचे थेट प्रक्षेपण करावे, असे PEMRA ने सांगितले आहे. PEMRA (सुधारणा) कायदा २००७ मधील कलम २७ (ए) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>> Video : “…त्यानंतर मी पूर्णपणे बरा झालो,” ‘भारत के राजीव’ म्हणत काँग्रेसने शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा जुना व्हिडीओ
इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रसारणावर बंदी का?
मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान इस्लामाबादमध्ये एफ-९ पार्क या ठिकाणी सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पीटीआय पक्षाचे नेते शाहबाज गिल यांचा छळ केला जात आहे, असा आरोप केला. तसेच इस्लामाबादचे महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि महिला दंडाधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. इम्रान यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या भाषणाच्या थेट प्रसारणावर बंदी घालण्यात आली.
हेही वाचा >>>> “उत्पादन शुल्क घोटाळ्यात मनीष सिसोदिया प्रमुख आरोपी पण…” अरविंद केजरीवाल यांचे नाव घेत भाजपाने केला मोठा दावा
दरम्यान, पीटीआय पक्षाचे नेते शाहबाज गिल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. सैनिकांमध्ये बंडखोरी व्हावी यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपांच्या चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र शुक्रवारी इस्लामाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते.