पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात हिंसक झालेल्या एका जमावाने शनिवारी एका पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. यानंतर या जमावाने ईशनिंदेचा आरोपी असणाऱ्या एका व्यक्तीस बेदममारहाण करत ठार केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने लाहोरपासून जवळपास ८० किलोमीटर अंतरावरील वारबर्टन, ननकाना साहिब पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि आरोपी वारिस इसा यास ताब्यात घेतले. यानंतर त्याला निर्वस्त्र करण्यात आले आणि रस्त्यावर खेचत बेदममारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, परिसरातील रहिवांशांनी सांगितले की संबंधित व्यक्ती दोन वर्षे तुरुंगात राहून घरी परत आल्यानंतर पवित्र ग्रंथांवर आपल्या अगोदरच्या पत्नीचे फोटो चिकटवून जादूटोना करत होता. या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायर होत आहेत. एका व्हिडिओमध्ये जमाव पोलीस स्टेशनच्या मोठ्या गेटवर चढताना दिसत आहे. या जमावामध्ये काही लहान मुलंही दिसत आहेत.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेतील सहभागी लोकांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी असा प्रश्नही उपस्थित केला आहे की, पोलीस हिंसक जमावाल रोखण्यास का असमर्थ ठरली? त्यांनी पंजाब पोलीस महानिरीक्षक यांना जिल्ह्यात कायदा आणि सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan mob storms nankana sahib police station lynches man accused of blasphemy msr