लष्कराची पकड मजबूत असल्याचे सिद्ध
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर निवृत्त लेफ्टनंट जनरल नासेर खान जानजुआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानने या नियुक्तीतून सुरक्षा कामकाजात लष्कराची मजबूत पकड असल्याचे दाखवून दिले आहे.
सरकारने काल त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली असून आधीचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज हे आता केवळ परराष्ट्र कामकाज सल्लागार राहतील. जानजुआ यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली असून त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा राहील. जानजुआ हे बलुचिस्तानातील क्वेट्टाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख होते व ते या महिन्यात निवृत्त झाले आहेत. आतापर्यंत अझीज (वय ८६) हे सुरक्षा सल्लागार होते, त्यांना संघराज्य मंत्र्याचा दर्जा होता. नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नेमणूक अझीज यांना राजनैतिक कामकाजावर लक्ष ठेवण्यास उपयोगी पडणार आहे. जानजुआ यांचे कार्यालय पंतप्रधान सचिवालयात राहील. परराष्ट्र कार्यालयात असणार नाही. जानजुआ यांना आता पूर्वेकडे भारत व पश्चिमेकडे अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जर भारत पाकिस्तान यांच्यात
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा झाली तर ते पाकिस्तानचे नेतृत्व करतील.

Story img Loader