पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यात आली आहे. आमिर लियाकत असे या अँकरचे नाव असून त्याने पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांच्यावरही आपली नाराजी व्यक्त केली आहे. तारेक फतेह यांच्याबाबतीत बोलताना त्याची जीभ नरेंद्र मोदींवर घसरली. त्याने मोदींच्या वैवाहिक जीवनाबद्दलही वक्तव्य केले. मोदी हे गुजरातचे कसाई असल्याची टीका त्याने केली. सुमारे तासभर लांबीचा हा व्हिडिओ पाकिस्तानी वाहिनीने प्रक्षेपितही केला. एवढ्यावरच आमिर लियाकत थांबला नाही. तारिक फतेह हे ‘रॉ’ आणि मोदींशी संबंधित असल्याचे त्याने म्हटले. आपल्या संपूर्ण कार्यक्रमात त्याने तारेक फतेह यांचा भंडाफोड केल्याचा दावा केला. कार्यक्रमात त्याने अत्यंत अर्वाच्च भाषा वापरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in