पीटीआय, वॉशिंग्टन : पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे असुरक्षित असल्याने तो जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे, अशी टिप्पणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी व्यक्त केली. पाकिस्तानने मात्र त्यांच्या या भाष्याचे खंडन केले आहे. जगाच्या बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बायडेन यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की जग झपाटय़ाने बदलत आहे आणि सर्व देश त्यांच्या इतर राष्ट्रांशी असलेल्या मैत्रीसंबंधांचा पुनर्विचार करत आहेत. जगाचे आपल्याकडे लक्ष आहे. आपण काय करतो याकडे आपले शत्रूही बारकाईने पाहात आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत चीन, रशिया आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करतील, असा कुणी विचार तरी केला होता का? पण हे सध्या घडत आहे.

पाकिस्तानातील अण्वस्त्रांच्या असुरक्षिततेबद्दल पाश्चात्त्य देश नेहमीच चिंता व्यक्त करतात. पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या किंवा ‘जिहादीं’च्या हाती पडू शकतात, ही त्यांची चिंता आहे. या संदर्भात ब्रुकिंग्ज येथील परराष्ट्र धोरण कार्यक्रमातील वरिष्ठ तज्ज्ञ मर्विन काल्ब यांनी सविस्तर भाष्य केले होते. ‘‘मे १९९८ मध्ये पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत पहिली अणुचाचणी केली. तेव्हापासून अमेरिकेच्या सर्व अध्यक्षांना पाकिस्तानची अण्वस्त्रे चुकीच्या हाती पडण्याची भीती वाटत आली आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानच्या विजयानंतर जिहादी पाकिस्तानची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करण्याचा धोका वाढला आहे, असे काल्ब म्हटले होते. तर अफगाणिस्तानातून अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतल्याने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा इशारा अमेरिकेचे संयुक्त लष्करप्रमुख मार्क मिली यांनी दिला होता.

Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Delhi Schools Receive Bomb Threat
Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी प्रकरणात मोठी माहिती समोर; १२ वीच्या विद्यार्थ्याला अटक, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
wakahan corridor afghanistan
अफगाणिस्तानच्या ‘चिकन नेक’वर पाकिस्तानचा ताबा? काय आहे वाखान कॉरिडॉर?
India campaign to kill terrorists in Pakistan print exp
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्या घडवून आणण्याची भारताची मोहीम? ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या दाव्यात किती तथ्य?
pakistan in unsc
भारताची चिंता वाढली? दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य; याचा अर्थ काय?

पाकिस्तानकडून खंडन

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी बायडेन यांच्या भाष्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि त्याचे खंडन केले. पाकिस्तान अण्वस्त्रांबाबत जागतिक मानकांचे पालन करत आहे. जोपर्यंत पाकिस्तानच्या आण्विक मालमत्तेचे संरक्षण आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे, आम्ही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनुसार सर्व आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करतो, असेही झरदारी यांनी स्पष्ट केले.

Story img Loader