पीटीआय, वॉशिंग्टन : पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे असुरक्षित असल्याने तो जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे, अशी टिप्पणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी व्यक्त केली. पाकिस्तानने मात्र त्यांच्या या भाष्याचे खंडन केले आहे. जगाच्या बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बायडेन यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की जग झपाटय़ाने बदलत आहे आणि सर्व देश त्यांच्या इतर राष्ट्रांशी असलेल्या मैत्रीसंबंधांचा पुनर्विचार करत आहेत. जगाचे आपल्याकडे लक्ष आहे. आपण काय करतो याकडे आपले शत्रूही बारकाईने पाहात आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत चीन, रशिया आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करतील, असा कुणी विचार तरी केला होता का? पण हे सध्या घडत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा