पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना इस्लमाबादमधील एका हल्ल्याला समोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, इस्लमाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात परवेझ मुशर्रफ थोडक्यात बचावले. बॉम्बस्फोट होताच तेथून सुरक्षितरित्या निघून जाण्यात मुशर्रफ यांना यश आले.
मंगळवारी राजद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयाने मुशर्रफ यांना दोषी ठरविले आहे. गुन्हेगारी खटल्याला सामारे जाणारे ते पहिले लष्करशहा आहेत. त्यांना नोव्हेंबर २००७ मध्ये देशात आणीबाणी लादणे तसेच कलम ६ अन्वये राज्यघटना निलंबित करण, न्यायाधीशांची धरपकड करणे या आरोपानुसार राजद्रोहाखाली दोष ठरवण्यात आले. या प्रकरणात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.दरम्यान आजारी आईला भेटण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीत जाऊ देण्याची मुशर्रफ यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2014 रोजी प्रकाशित
परवेज मुशर्रफ आत्मघाती हल्ल्यातून बचावले
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना इस्लमाबादमधील एका हल्ल्याला समोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, इस्लमाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात परवेझ मुशर्रफ थोडक्यात बचावले
First published on: 03-04-2014 at 11:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan pervez musharraf survives assassination bid in islamabad