पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना इस्लमाबादमधील एका हल्ल्याला समोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, इस्लमाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात परवेझ मुशर्रफ थोडक्यात बचावले. बॉम्बस्फोट होताच तेथून सुरक्षितरित्या निघून जाण्यात मुशर्रफ यांना यश आले.
मंगळवारी राजद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयाने मुशर्रफ यांना दोषी ठरविले आहे. गुन्हेगारी खटल्याला सामारे जाणारे ते पहिले लष्करशहा आहेत. त्यांना नोव्हेंबर २००७ मध्ये देशात आणीबाणी लादणे तसेच कलम ६ अन्वये राज्यघटना निलंबित करण, न्यायाधीशांची धरपकड करणे या आरोपानुसार राजद्रोहाखाली दोष ठरवण्यात आले. या प्रकरणात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.दरम्यान आजारी आईला भेटण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीत जाऊ देण्याची मुशर्रफ यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा