भारताचे शेजारील राष्ट्र अर्थात पाकिस्तान मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाला तोंड देत आहे. येथे धान्य, अन्नपदार्थ, दूध यासारख्या साध्या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. असे असतानाच सरकारचा महसूल वाढावा यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. येथे एक लिटर पेट्रोलसाठी २७२ पाकिस्तानी रुपये मोजावे गालणार आहेत. तर डिझेलचा दर प्रतिलिटर २८० पाकिस्तानी रुपये झाला आहे. आधीच महागाईला तोडं देत असलेल्या पाकिस्तानात इंधन दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे पाकिस्तानी जनतेच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
हेही वाचा >> BBC Income Tax Raid : बीबीसी कार्यालयावरील कारवाईनंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “इंदिरा गांधींनी…”
पाकिस्तान सरकारने वस्तू व सेवा करामध्ये १८ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी तसेच करवाढीतून १७० अब्ज पाकिस्तानी रुपये महसूल उभा राहावा यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. सोबतच पाकिस्तानने पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पेट्रोलचा दर प्रतिलिटर २२.२० पाकिस्तानी रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर १८ पाकिस्तानी रुपयांनी वाढण्यात आला आहे. केरोसीनचाही दर प्रतिलिटर २०२२.७३ रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. याच कारणामुळे पाकिस्तानी जनतेला महागाईची झळ बसणार आहे.
हेही वाचा >> BBC Income Tax Raid : BBC च्या कार्यालयावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप!
एक लिटर दूध ८०० रुपयांना
दरम्यान, इंधन दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या येथे एक लिटर दूध २१० पाकिस्तानी रुपये तर एक किलो चिक ७०० ते ८०० रुपयांना मिळत आहे. सोबतच गडू, गडधान्ये, फळभाज्या यांचाही भाव गगनाला भिडला आहे. पाकिस्तानमधील ही महागाई २०२३ सालातील पहिल्या सहामाईत कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.