मंगळवारी (दि. २५) जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जगातील सर्वच राजकीय नेत्यांनी यानिमित्त ट्विट करत शुभेच्छा दिल्या. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे. या दोघांनी यासंबंधी ट्विट केले. मात्र, या दोघांच्या ख्रिसमस शुभेच्छांमधील फरकाची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

इम्रान खान यांनी आपल्या देशातील सर्व ‘ख्रिश्चन नागरिकांना’ ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान यांच्या शुभेच्छातूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मूलभूत फरक दिसून येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्तांनी सर्वांना दयेची शिकवण दिली असल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इम्रान यांनी या शुभेच्छा संपूर्ण पाकिस्तान नव्हे तर पाकिस्तानमधील फक्त ख्रिश्चन समाजाला दिल्या आहेत. याचे कुणाला आश्चर्यही वाटलेले नाही. ज्या देशात आपण वाढलो आहोत. त्याचे मुलभूत अधिकार समान नसल्याचे, इम्रान यांच्या ट्विटवरून दिसते. बॅरिस्टर जिना हे दुर्दैवाने त्यांच्या भाषणाचे भाषांतर करू शकले नाहीत. पाकिस्तानातील अल्पसंख्यक त्यांच्या मंदिरात जाऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते.

पण पाकिस्तानातील हिंदू आणि शिख समाजाला त्यांच्या मंदिरात किंवा गुरूद्वारात जाऊन प्रार्थना करण्यास परवानगी असली तरी या नागरिकांना आयएसआय या गुप्तचर संघटनेची भीती असते. कारण पाकिस्तान हा धर्मनिरपेक्ष किंवा समतावादी देश नसून तो एकल धर्म प्रभावी देश म्हणजे इस्लाम प्रजासत्ताक देश आहे.

पाकिस्तानच्या घटनेनुसार, मुस्लीम हे देशाचे प्रथम नागरिक आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की, सर्वच मुस्लीम तिथे समान नाहीत. प्रत्येक अहमदियांना क्षणोक्षणी जीवाची भीती वाटत असते. त्यामुळेच त्यांच्या पंतप्रधानांनी फक्त ख्रिश्चन समाजालाच शुभेच्छा दिल्या आहेत. कारण तेच फक्त ख्रिसमस साजरा करतात. याउलट हिंदूबहुल भारतात प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने त्या-त्या धर्माप्रमाणे साजरा केले जातात.

Story img Loader