जिवावरची जोखीम घेऊन निवडणूक लढविण्यासाठी पाकिस्तानमध्ये परतलेले माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना पहिला ‘देशी’ झटका मिळाला आहे. पंजाब प्रांतातील कसूर येथील मतदारसंघातील त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी नाकारण्यात आल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे. त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रावारील स्वाक्षरीशी उमेदवारी अर्जातील स्वाक्षरी जुळत नसल्याचे कारण दाखवीत हा अर्ज फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जावेद कसुरी या वकिलाने मुशर्रफ यांच्या उमेदवारीवर संविधानातील ६२/६३ कलमानुसार आक्षेप घेतला होता. या कलमांत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे चारित्र्य चांगले असावे, भ्रष्टाचारापासून लांब असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढवावी, असे म्हटले आहे. मुशर्रफ कराची, इस्लामाबाद, चित्रल आणि कसूर येथून निवडणूक लढवीत आहेत. इस्लामाबाद येथेही त्यांच्या उमेदवारीबाबत आक्षेप घेणारा अर्ज दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान भ्रष्टाचाराच्या विविध प्रकणांवर त्यांच्यावर चालविल्या जाणाऱ्या खटल्याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांची निवडणूक उमेदवारी रद्द करण्यासाठी पाकिस्तानी वकिलांची फळी कार्यरत झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुशर्रफ यांना पहिला झटका
जिवावरची जोखीम घेऊन निवडणूक लढविण्यासाठी पाकिस्तानमध्ये परतलेले माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना पहिला ‘देशी’ झटका मिळाला आहे. पंजाब प्रांतातील कसूर येथील मतदारसंघातील त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी नाकारण्यात आल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-04-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan polls nomination papers of pervez musharraf rejected