अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. विमानतळावर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आहे. असं असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबानी सत्तेचं स्वागत केलं आहे. “गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणं सोपं नसतं. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखं आहे.”, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे.

दुसरीकडे, तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, “चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.” दरम्यान, सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अशरफ घनी आता अमेरिकेत जाऊ शकतात.  अशा परिस्थितीत अशरफ घनी सध्या ओमानमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष देशातून तर पळाले मात्र शेजाऱ्यांनी विमान लॅण्डच होऊ दिलं नाही; आता…

अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य प्रस्थापित झाल्याने अमेरिका, ब्रिटेन, उत्तर कोरिया, ऑस्ट्रेलियासहित अनेक देशांनी आपली दूतावास बंद केले आहेत. अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरलं होतं. यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तालिबानला बाहेर केलं. त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रशिक्षण दिलं. अमेरिकेने गेल्या २० वर्षातील युद्धात २० खरब डॉलर खर्च केले आणि २,३१२ सैनिक शहीद झाले आहेत.

संपूर्ण जग चिंता व्यक्त करत असताना चीनने तालिबानकडे पुढे केला मैत्रीचा हात, म्हणाला…

तालिबानचा उदय कसा झाला?

सोव्हिएत सैन्याच्या माघारीनंतर विविध समूहात विभागलेल्या संघटना आपापसात लढू लागल्या होत्या. या दरम्यान १९९४ मध्ये या समूहातून एक सशस्त्र गट उदयास आला आणि १९९६ पर्यंत त्याने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवला. त्यानंतर संपूर्ण देशात इस्लामिक कायदा लागू केला.

Story img Loader