Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्याला सर्व शेजारी देशांबरोबर शांतता आणि मैत्री हवी आहे, असं महत्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या शेजारील देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं बोललं जात आहे. तसेच प्रगती आणि शांतता एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान शांततापूर्ण वातावरणाच्या बाजूने असल्याचंही शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलताना शाहबाज शरीफ यांनी हे विधान केलं. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं की, “पाकिस्तानला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत. परंतु आपला देश कोणत्याही किंमतीत आपल्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. तसेच पाकिस्तानचा इतर कोणत्याही देशाविरुद्ध आक्रमक करण्याचा कोणताही हेतू नाही. शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी पाकिस्तानने कायम महत्वाची भूमिका बजावली आहे. शांतता राखणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण प्रगती आणि शांतता एकमेकांशी जोडले गेलेले आहेत”, असं शाहबाज शरीफ म्हणाले आहेत.

challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Indian Foreign Secretary Vikram Misri visits Bangladesh
परराष्ट्र सचिव मिस्राी आज ढाक्यात; बांगलादेशला दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा
Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”

हेही वाचा : Manipur Drone Attack : मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी

दरम्यान, या कार्यक्रमात पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ लष्करी आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “देश राजकीय मतभेदांना द्वेषात बदलू देणार नाही. सैन्य आणि जनता यांच्यातील मजबूत संबंध हा दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शत्रूला पराभूत करण्यासाठी पाया म्हणून काम करेल. सशस्त्र दल आणि राष्ट्र यांच्यातील नाते घट्ट आहे. नैसर्गिक आपत्ती, परकीय शत्रुत्व किंवा दहशतवादाविरुद्ध युद्धाच्या घटनांमध्ये बचाव कार्य यासह सर्व क्षेत्रात राष्ट्राने सैन्याला नेहमीच बळकटी दिली”, असंही ते म्हणाले.

काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला

पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पंतप्रधान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी असीम मुनीर यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. असीम मुनीर यांनी म्हटलं की, “हा मुद्दा पाकिस्तानसाठी नेहमीच महत्त्वाचा असतो आणि हा केवळ राष्ट्रीय मुद्दा नसून तो प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाचा मुद्दा आहे.”

Story img Loader