फ्रान्समधील मासिकाने प्रे. मोहम्मद पैगंबराची व्यंगचित्रे पुनप्र्रकाशित केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानातील धार्मिक-राजकीय गटांनी शुक्रवारी देशभरात ‘काळा दिवस’ पाळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शार्ली एब्दो’ या मासिकाच्या कार्यालयावर पॅरिसमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाल्यानंतर बुधवारी या मासिकाने पुन्हा व्यंगचित्रे प्रकाशित केली. त्यामुळे शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर देशभरात निषेध पाळावा, असे विविध गट आणि राजकीय पक्षांनी जाहीर केले होते.
तहरिक हुर्मत-ए-रसूल आणि जमात-इ-इस्लामी, जमात-ऊद-दावा, सुन्नी तहरिक, सुन्नी इत्तेहाद यांसह अनेक गटांनी या प्रकाशन संस्थेविरोधात देशव्यापी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली होती. लाहोरमधील चौबुर्जी येथे निदर्शने करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
सरकारने सुरक्षेच्या कडेकोट उपाययोजना आखल्या असल्या तरी यादरम्यान हिंसाचाराचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानात २०१३ धार्मिक गटांच्या निदर्शनांच्या वेळी हिंसाचाराचा उद्रेक होऊन त्यामध्ये अनेक जण ठार झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan protest charlie hebdo