पनामा पेपर्स प्रकरणात अपात्र ठरवण्यात आल्याच्या निकालावर पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर १२ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शरीफ व त्यांच्या मुलांना परदेशात बेहिशेबी मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्या विरोधात निकाल देताना २८ जुलै रोजी त्यांना संसदेशी अप्रामाणिकपणा केल्याच्या आरोपाखाली अपात्र ठरवले होते, ते व त्यांच्या मुलांवर बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात खटले चालवण्याचा आदेशही देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आठवडय़ातील कामकाज पत्रिकेनुसार तीन  सदस्यांचे न्यायपीठ शरीफ यांच्या फेरविचार याचिकेची सुनावणी करणार आहे.   फेरविचार याचिकेत जे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत ते न्यायालयाने आधीच फेटाळले आहेत. त्यात काहीही बदल झालेला नसल्याने आधीच्या निकालात बदल होण्याची शक्यता कमी आहे असे सांगण्यात आले.

Story img Loader