बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या सुरक्षेबाबत पाकिस्तानचे अंतर्गतमंत्री रेहमान मलिक यांनी केलेली मागणी म्हणजे पाकिस्तान सपशेल अपयशी ठरल्याचे द्योतक असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानला शाहरुख खान यांच्याशी काय देणे-घेणे आहे, त्यांनी त्यांचा विचार करावा. पाकिस्तान आपले अपयश आणि गैरकृत्ये झाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही नायडू यांनी गोव्यात पत्रकारांना सांगितले. शाहरुख खान याच्या वक्तव्याबाबतचा वाद हा पाकिस्तानने रचलेला सापळा असून ते सातत्याने असे प्रयत्न करीत असतात. एका मासिकात लिहिलेल्या लेखावरून आपल्याला स्पष्टीकरण द्यावे लागले, ही क्लेशदायक बाब आहे, असे खान याने म्हटले आहे.

Story img Loader