पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे झालेल्या राजकीय संघर्षात किमान ४५० जण जखमी झाले आहेत. तेहरिक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी लीग तेहरिकचे नेते ताहीर उल कादरी यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निवासस्थानाबाहेर मोर्चा काढण्यात आला. नवाज शरीफ यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करत ते पंतप्रधानांच्या घरावर हल्ला चढवला होता. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी इस्लामाबादमधल्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी शनिवारी रात्री पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निवासस्थान आणि संसद भवनावर हजारो निदर्शकांनी वायर कटर आणि काठ्या घेऊन हल्ला चढवला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला, त्यात शेकडो निदर्शक जखमी झाले आहेत. त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यात किमान ७ जणांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत.

Story img Loader