काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे मंत्री केएन राजन्ना यांनी शनिवारी एक वादग्रस्त विधान केल्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. कर्नाटक विधानसभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहीजेत, असं विधान त्यांनी केलं आहे. काँग्रेसचे नेते सय्यद नसीर हुसैन यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर कर्नाटक विधानसभा परिसरात त्यांच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केएन राजन्ना शनिवारी म्हणाले, “घोषणा दिल्यानंतर काय झालं? काँग्रेसच्या प्रतिमेला काही धक्का बसलेला नाही. उलट आमची प्रतिमा उजळून निघाली आहे. जर कुणी पाकिस्तानची भलामण करत असेल किंवा पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असेल तर त्यांना सरळ गोळ्या घाला. त्यात काहीच अडचण नाही.” राजन्ना यांच्या या विधानाचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या सहा आमदारांसह ११ आमदार भाजपाशासित उत्तराखंडमध्ये दाखल

उत्तर प्रदेशमधील बुलडोजर कारवाईचे केले समर्थन

राजन्ना यांनी काही काळापूर्वी उत्तर प्रदेशमधील बुलडोजर कारवाईचे समर्थनही केले होते. ते म्हणाले की, बुलडोजरचा वापर करून आरोपींची घरे पाडणे यासारख्या सरकारी कारवायांमुळे अधिक लोकसंख्या असणाऱ्या राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आली आहे. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात येणार असेल तर आम्ही अशा कारवाईचा विरोध करणार नाही.

पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या तिघांना अटक

विधानसभेतील घोषणाबाजीचे प्रकरण समोर आल्यानंतर तीन लोकांना अटक करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या परिसरात सदर घोषणाबाजी झाली असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सदर घोषणाबाजीच्या व्हिडिओची न्यायवैद्यकशास्त्र चाचणी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.

पाकिस्तान समर्थनार्थ केलेल्या घोषणाबाजीनंतर भाजपाने काँग्रेसवर टीकेची संधी साधली. काँग्रेस विश्वासघातकी असल्याचा आरोप करत घोषणा देणारे आरोपी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध फोटोंमध्ये दिसून आल्याचा आरोपही भाजपाने केला. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, २७ फेब्रुवारी रोजी काँग्रेसशासित राज्यात अशी घोषणाबाजी झाल्यानंतर कन्नडिगांचा आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान झाला आहे.

घोषणाबाजीच्या प्रकरणात नोंदविलेल्या एफआयआरमध्ये काँग्रेसचे नवे खासदार सय्यद नसीर हुसैन यांच्याही नावाचा समावेश करावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना राज्यसभेची शपथ देऊ नये, अशीही विनंती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांना करणार असल्याचे भाजपाने म्हटले आहे.