पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना गुरुवारी पाकिस्तान रेंजर्संनी अटक केली होती. इम्रान खान सुनावणीसाठी इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. पण पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. शिवाय इम्रान खान यांची तातडीने सुटका करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

खरंतर, गुरुवारी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनल्लाह या तीन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. यानंतर न्यायाधीशांनी इम्रान खान यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

७० वर्षीय इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयात हजर केले असता त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्संनी आपलं अपहरण केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्याला काठीने मारहाण केली. एखाद्या गुन्हेगारालाही अशी वागणूक दिली जात नाही. माझ्याबरोबर काय घडतंय? हेही मला अजून माहीत नाही, असं इम्रान खान यांनी सुप्रीम कोर्टात सांगितंल.

हेही वाचा- VIDEO: इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये तणाव, समर्थकांकडून लष्करी मुख्यालयावर हल्ला

इम्रान खान यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच न्यायालयाने इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सुटकेचे आदेश दिले असले तरी इम्रान खान यांना अद्याप मुक्त करण्यात आलं नाही. सुरक्षेचं कारण सांगून घरी जाण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना इस्लामाबादच्या पोलीस लाईन गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात येणार आहे.