‘आयएसआय’ या गुप्तचर संघटनेच्या मुख्यालयावर २००९ मध्ये हल्ला करून ३५ जणांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने तीन तालिबानी अतिरेक्यांना २३ वेळा फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याखेरीज न्यायालयाने पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाची रक्कम प्रत्येक बळीच्या नातेवाइकांना देण्यात यावी, असाही आदेश न्यायालयाने बजावला आहे. बशीर अहमद, सरफराझ आणि अबीद अशी या तीन अतिरेक्यांची नावे आहेत.
फिर्यादी पक्षाने याप्रकरणी आरोपींविरोधात न्यायालयात सर्व पुरावे सादर करून साक्षीदारांच्या साक्षीही मांडल्या. ‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ या पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असलेले हे तीन अतिरेकी आदिवासी भागात जाऊन दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेत होते.
लाहोर येथे मे २००९ मध्ये या तिघांनी घडवून आणण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक कर्नल व सहा अधिकाऱ्यांसह ३५ जण ठार, तर २५० हून अधिक जण जखमी झाले होते.
पाकिस्तानी न्यायालयाकडून तीन तालिबान्यांना २३ वेळा फाशीची शिक्षा
‘आयएसआय’ या गुप्तचर संघटनेच्या मुख्यालयावर २००९ मध्ये हल्ला करून ३५ जणांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने तीन तालिबानी अतिरेक्यांना २३ वेळा फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
First published on: 31-01-2015 at 06:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan to hang 3 taliban 23 times