पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग पक्षाने विजय मिळविल्यानंतर सर्वाचेच लक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले होत़े  ही निवडणूक ६ ऑगस्ट रोजी अर्थात अपेक्षेपेक्षा महिनाभर आधी घेण्याची घोषणा मंगळवारी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली़  या निवडणुकीनंतर पाकिस्तानचे विद्यमान अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना पायउतार व्हावे लागणार आह़े
 झरदारी सध्या दुबई आणि लंडनच्या खासगी दौऱ्यावर आहेत़  त्यांचा अध्यक्षपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ८ सप्टेंबर रोजी संपत आह़े  त्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भाग घेणार नसल्याचे झरदारींकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आह़े  संसदेतील सध्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेता, पाकिस्तान मुस्मिल लीग(नवाझ)चे प्रमुख नवाझ शरीफ सहजपणे अध्यक्षपदाची शिडी चढणार आहेत़
४२ राष्ट्रीय तसेच प्रादेशिक जागांसाठी २२ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आह़े  त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी घेणे घाईचे होणार असल्याचे निरीक्षण अनेक राजकीय विश्लेषकांनी नोंदविले आह़े  अध्यक्षपदासाठी कायदेमंडळात निवडणूक होत़े  ज्यात ४ प्रादेशिक कायदेमंडळाचे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी भाग घेतात़
विद्यमान राष्ट्रध्यक्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी या निवडणुका घेण्याच्या निर्णयावर झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते खुर्शिद शाह यांनी सडकून टीका केली आह़े  कायदेशीररीत्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक २२ ऑगस्टनंतरच घेण्यात येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आह़े
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आह़े  त्यानंतर २६ जुलैपर्यंत अर्जाची छाननी होऊन २९ जुलै रोजी अंतिम उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा