नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित राहणार असल्याच्या वृत्तापाठोपाठ भारतासाठी आणखी एक आशादायी वृत्त आहे. पाकिस्तान १५१ भारतीय मच्छिमारांची सुटका करणार आहे. तसेच यापाठोपाठ, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनीही श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
राजपक्षे यांनी मच्छिमारांची सुटका करण्याबाबतचा निर्णय ट्विटरवरून जाहीर करत, सद्भावना म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय मच्छिमार दुर समुद्रात गेल्यावर वाट चुकून श्रीलंकेच्या सागरी हद्दीत जातात, तेव्हा त्यांना कैद करून ठेवले जाते. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही असाच निर्णय घेत पाकिस्तानी हद्दीत चुकून गेलेल्या  मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader